Home महाराष्ट्र 400 वर्षांपूर्वीचा वटवृक्ष वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा पुढाकार; नितीन गडकरींना लिहिलं पत्र

400 वर्षांपूर्वीचा वटवृक्ष वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा पुढाकार; नितीन गडकरींना लिहिलं पत्र

सांगली : राष्ट्रीय महामार्गाच्या कामात येणारे 400 वर्षे जुन्या वटवृक्षाला वाचवण्यासाठी सांगलीतील वृक्ष प्रेमींनी आंदोलन सुरू केलं आहे.  यात आता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही पुढाकार घेतला आहे.

400 वर्षांचा वटवृक्ष महामार्गाच्या रुंदीकरणासाठी तोडण्यात येणारे. याला वृक्षप्रेमींनी विरोध केला असून त्यासाठी चिपको आंदोलनंही केलं होतं. या चिपको आंदोलनाची दखल घेत आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवले आहे.

रत्नागिरी-कोल्हापूर-सोलापूर-नागपूर या महामार्गाचं काम अतिशय गतीने सुरू असल्याबद्दल आपले आभार. याच मार्गालगत भोसे याठिकाणी 400 वर्षांपूर्वीचा महाकाय वटवृक्ष आहे. दुर्मिळ पक्ष्यांचं आश्रयस्थान आणि त्या परिसरातील ऐतिहासिक ठेवा असलेल्या वटवृक्षाचे जतन व्हावं. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि वटवृक्षाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन वटवृक्ष वाचवावा ही विनंती, अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी नितीन गडकरी यांनी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

दूध दरावरून राजू शेट्टी – सदाभाऊ खोत आंदोलनाच्या मैदानात आमने सामने

“यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांकडून गाईडलाईन्स जारी”

आपापसात मारामाऱ्या करा, पण…; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला

परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर..; जयंत पाटलांचा सांगलीकरांना इशारा