Home महाराष्ट्र परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर..; जयंत पाटलांचा सांगलीकरांना इशारा

परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर..; जयंत पाटलांचा सांगलीकरांना इशारा

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यासंदर्भात पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर जयंत पाटील यांनी संवाद साधत जिल्ह्यातील नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. तसेच पुन्हा लॉकडाउन करण्याचा इशाराही दिला आहे.

गेल्या काही दिवसात सांगली जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. मी कालच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. प्रशासन सर्व खबरदारी घेत आहे. जनतेने आरोग्याची काळजी घ्यावी. आपण गर्दीत जाऊ नका, गर्दी करू नका, सोशल डिस्टनसिंगचे पालन करा ही नम्र विनंती.

दरम्यान, अशा प्रकारे ट्विट करत प्रशासनाला सहकार्य करा, नियमांचे पालन करा, काळजी घ्या, असा इशारा जयंत पाटील यांनी सांगलीकरांना दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा…; अजित पवारांचं आवाहन

शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आमदारकी मिळणार समजताच शांत बसले- चंद्रकांत पाटील

या सरकारलाच कोरोना झाला असून…; सदाभाऊ खोत यांची राज्य सरकारवर टीका

भगव्याला विरोध करणारे व गुंडाळून ठेवणारे पक्ष सत्तेत तर मग…; भाजपच्या ‘या’ नेत्याची राज्य सरकारवर टीका