Home महाराष्ट्र “हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पित”; सुधीर मुनगंटीवारांचा राज्य सरकारवर टीका

“हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पित”; सुधीर मुनगंटीवारांचा राज्य सरकारवर टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

‘मस्त पियो, खुब जियो हा या सरकारचा मंत्र आहे. हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पित आहे. कोरोनात सर्वसामान्यांना औषधांची गरज आहे. पण आम्ही दवा नही दाऊ देंगे, असं हे सरकार आहे. कष्टकऱ्यांबाबत निर्णय घेण्यासाठी या सरकारला वेळ नाही. राजकारण करणे आणि दारुवाल्यांना प्रोत्साहन देणे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

हे ही वाचा : सुप्रीम कोर्टाने नितेश राणेंचा जामीन नाकारला; राणे कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

चंद्रपूरची दारुबंदी हटवली. वाईन प्रोत्साहन योजनेत 4 वर्षे आम्ही पैसे दिले नव्हते. ते पैसे यांनी कोरोनाच्या संकटकाळात आर्थिक तणावातही दिले. यांनी दारुवर जो 300 टक्के कर होता तर दीडशे टक्क्यांवर आणला. वीज स्वस्त असण्याचं कारण नाही, घरात वीज अंधार असला तरी चालेल. यातून शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही, उलट वाईन उद्योजकांनाच त्याचा फायदा होणार आहे. वाईन उद्योजक जे आहेत मी नाव घेणार नाही पण एका कंपनीचे बटिक आहेत. त्या कंपनीचं मी नाव घेणार नाही, पण त्या कंपनीची पोहोच एवढी आहे मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ती कंपनी स्वत:ला साजेसे निर्णय घेऊ शकते’, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“पुण्याचे महापाैर मुरलीधर मोहोळ यांना पुन्हा कोरोनाची लागण”

“औरंगाबादेत महाराणा प्रताप यांचा पुतळा बसवणारच, कुणीही विरोध करू नये”

काँग्रेसला मोठं खिंडार; अजित पवारांच्या उपस्थितीत 28 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश