Home महाराष्ट्र सुप्रीम कोर्टाने नितेश राणेंचा जामीन नाकारला; राणे कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

सुप्रीम कोर्टाने नितेश राणेंचा जामीन नाकारला; राणे कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय आणि हायकोर्टाने जामीन नाकारल्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण तिथेही नितेश राणेंना दिलासा मिळालेला नाही.

नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टानेही फेटाळला आहे. सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण होण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र सोबतच त्या 10 दिवसांमध्ये नितेश राणेंना अटक केली जाऊ नये असे निर्देश देत दिलासा दिला आहे.

हे ही वाचा : “पुण्याचे महापाैर मुरलीधर मोहोळ यांना पुन्हा कोरोनाची लागण”

दरम्यान, “10 दिवसांचा दिलासा दिला आहे. ट्रायल कोर्टात जाण्यास सांगितलं असून आम्ही जाऊ. तुम्ही म्हणत आहात तसं फेटाळण्यात आलेलं नाही, जर नितेश राणेला आजच्या आज हजर राहायला सांगितलं असतं तर त्याला फेटाळालं असं म्हणता आलं असतं, आम्ही ट्रायल कोर्टात जाऊ,” असं नितेश राणे यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“औरंगाबादेत महाराणा प्रताप यांचा पुतळा बसवणारच, कुणीही विरोध करू नये”

काँग्रेसला मोठं खिंडार; अजित पवारांच्या उपस्थितीत 28 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

“सामाजिक कार्यकर्ते, मुक्तांगण व्यसनमुक्ती संस्थेचे संस्थापक डाॅ.अनिल अवचट यांचं निधन”