आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एसटी विलिनीकरणाचा तिढा अणखी वाढतचं चालला आहे. राज्य सरकारने अनेक प्रयत्न केल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाही. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटीचं सरकारमध्ये विलनीकरण शक्य नाही, असं स्पष्ट केलं आहे. यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
“एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिणीकरणात काय अडचण आहे? राज्याची तिजोरी कशासाठी आहे हे मला कळतंच नाही. देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी खूप काटेकोरपणे राज्य चालवलं होतं. त्यामुळे आपल्याला 15 कोटींच्या वर कर्ज घ्यावे लागणार नाही. शिवाय कोविडमध्ये मोदींनी पाच टक्के आणखी वाढवून दिले आहेत, असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.
हे ही वाचा : उदयनराजे म्हणाले, काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटे लाज, अता शिवेंद्र राजे म्हणतात…
सभागृहामध्ये पगारवाढ देता येत नाही असं सांगितलं. मग त्या तिजोरीचे करायचे काय? नाही देत जा असं म्हणून चालतं नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
गेंड्याच्या कातडीचे सरकार झाले आहे. तुम्हाला लोकांनी निवडून दिले नाही तर गोळाबेरीज करून तुम्ही निवडून आले आहात. असा घणाघातही पाटलांनी यावेळी केला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“भाजपच्या ‘या’ भूमिकेला शिवसेनेने दिला पाठिंबा”
एसटीचं विलिनीकरण डोक्यातून काढून टाका, एसटीचं विलिनीकरण होणार नाही- अजित पवार
आधी नितेश राणेंचं म्याव म्याव, मग मलिकांचा ‘कोंबडा’ आणि आता पुन्हा पलटवार