आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपनं पुन्हा एकदा घवघवीत यश मिळवलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशभरात भाजपनं जल्लोषाला सुरुवात केलीय. महाराष्ट्र भाजपनेही प्रदेश कार्यालयाबाहेर जोरदार सेलिब्रेशन केलं. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला थेट आव्हान दिलंय.
हे ही वाचा : “…तर गोव्यात चित्र वेगळं दिसलं असतं”; रोहित पवारांनी व्यक्त केली खंत
‘मी आपल्या सर्वांना आगामी महापालिका निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो. ही महानगरपालिका काही करुन भाजपच्या ताब्यात आली पाहिजे, असं सांगतानाच पोपटाचा प्राण हा त्या महानगरपालिकेत अडकलेला आहे. आता सगळे वाभाडे निघालेत. आठवडाभरत धाडी चालल्या त्यातून स्पष्ट होईल की विकास किती केला आणि घरी किती पैसे नेले. त्यामुळे आता महापालिका हेच सर्वांचं टार्गेट असलं पाहिजे’, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरेंनी असं म्हटलं की 2024 ला आम्ही भगवा झेंडा दिल्लीवर फडकवू. हो भगवा झेंडाच पण तो भारतीय जनता पार्टीचा भगवा. तुम्ही सोबत असाल तर तो लावण्यासाठी आम्ही तुम्हाला सोबत घेऊ, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी आवरलं पाहिजे, कारण…; चंद्रकांत पाटलांचा सल्ला
भ्रष्टाचाऱ्यांवर यापुढे अधिक कठोर कारवाई होणार; पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर निशाणा
“प्रस्थापित राजकीय पक्षांना नाकारून पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला”