चिल्लर… थिल्लर गोष्टींकडे बघायला मला वेळ नाही; फडणवीसांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

0
153

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी थिल्लरबाजी करु नये असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यातील काटगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना फडणवीस यांनी केलेल्या टीकेकडे कसं बघता, असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, याकडे बघायला मला वेळच नाहीये. शेतकरी आणि माझी जनता यांच्याकडे माझं लक्ष असल्यानंतर, हे चिल्लर… थिल्लर, जे काही असेल त्याकडे बघायला मला वेळ नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आम्ही सगळेच आशावादी होतो की…; खडसेंच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

ज्या पक्षाने छळलं त्याच पक्षात नाथाभाऊंनी जाणं हे दुर्दैवी- रावसाहेब दानवे

ओहोटी संपली आता भरती येणार, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

फडणवीसांचं राजकारण इतकं खुनशी असेल वाटलं नव्हतं; खडसेंच्या राजीनाम्यानंतर ‘राष्ट्रवादीची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here