आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
गोंदिया : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले होते. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
यावेळी बोलताना दोन्ही नेत्यांनी जोरदार फटकेबाजी केली. प्रफुल पटेल यांच्या कार्यक्रमात आलो तर चर्चा तर होणारच, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तर दुसरीकडे प्रफुल पटेल यांनी फडणवीसांचा छोटा भाऊ म्हणून उल्लेख केला, त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
हे ही वाचा : 16 आमदार अपात्र ठरले तरी…; अजित पवारांचं मोठं विधान
तुमच्यातले अनेक जण विचार करत असतील, देवेंद्रजी इकडे कसे आले? राजकारणात अंदर-बाहरच्या गोष्टी रोजच चालत असतात. आमच्यात आणि त्यांच्यात खूप बोलणं होतं, गुप्त बोलणंही होतं. अनेकांना याचा त्रासही होईल,’ असा गाैफ्यस्फोट प्रफुल पटेल यांनी यावेळी केला. तर फडणवीसांनी, ‘प्रफुल भाईंनी मला निमंत्रित केलं याबद्दल मला आनंद आहे. मी इकडे आलो, तुम्ही इकडे आहात, त्यामुळे चर्चा तर होणारच. बात निकली है तो दूर तक भी जाएगी, असं म्हणत या चर्चांना अजून जोर दिला.
महत्त्वाच्या घडामोडी –
“उद्धवभाऊ, मुख्यमंत्री असताना राज ठाकरे मैदानात उतरले, आता काय झालं?”
“मोठी बातमी! काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; बाळासाहेब थोरातांनी दिला ‘या’ पदाचा राजीनामा”
आदित्य ठाकरेंची, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका, म्हणाले…