आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : टी 20 विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल मेलबर्नमध्ये महामुकाबला झाला त्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव करत वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली.
विराट कोहली या विजयाचा हिरो ठरला. त्याने हरलेली मॅच टीम इंडियाला जिंकून दिली. विराटने या मॅचमध्ये 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. यात 6 चौकार आणि 4 षटकार होते. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे.
हे ही वाचा : अभिनेत्री प्राजक्ता माळी, शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या घरी; मनसेत प्रवेश करणार?; राजकीय चर्चांना उधाण
टीम इंडियाने मिळवलेल्या या विजयाचे पडसाद राजकारणातही उमटले आहेत. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी काल झालेल्या मॅचचा उल्लेख केला. ‘काल टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्धची मॅच जिंकली, तशीच मॅच आम्ही तीन महिन्यांपूर्वी जिंकली होती. राज्यात परिवर्तनाचं सरकार आलं आणि राज्यात विकासाचं पर्व सुरू झालं,’ असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘गद्दारीचा पराक्रम त्यांनी केला असेल. विराट कोहलीची बॅटिंग देश जिंकण्यासाठी होती. उभ्या भारताला अभिमान वाटेल, असा तो कालचा दिवस होता. ते तुमच्यासारखे मैदान सोडून पळाले नव्हते. ते मैदानात खेळले आणि मैदानात जिंकले. तुम्ही मैदान सोडून पळालेली माणसं आहात. पाठीत सुरा खुपसलेली माणसं आहात, त्यामुळे गद्दारांनी आपली तुलना त्यांच्याशी करू नये, ते असं करत असतील तर त्याच्यासारखा विनोद नाही, हे हास्यास्पद आहे’ , असा टोला अरविंद सावंत यांनी यावेळी लगावला.
महत्त्वाच्या घडामोडी –
मनसे-भाजप महायुती होणार की नाही? गुलाबराव पाटील, म्हणाले…
मोठी बातमी! रवी राणा यांच्याविरोधात बच्चू कडू यांची पोलिसात तक्रार, म्हणाले, राणा यांनी…
माझ्या डोळ्यात सहसा पाणी येत नाही, पण आज…; राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले…