सिंधुदुर्ग : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सिंधुदुर्गमधील लाईफटाईम महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत.
“मी आज महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगायला आलोय की तुम्ही जो जनादेश दिला होता त्या पवित्र जनादेशाचा अनादर करण्यात आला. एक अपवित्र आघाडी करुन सत्तेच्या लालसेपोटी येथे सरकार स्थापन झालं. जनादेश नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार स्थापन करण्याचा होता. ते म्हणतात आम्ही वचन तोडलं. आम्ही वचन पाळणारे लोक आहोत. आम्ही असं ढळढळीत खोटं बोलत नाही,असं अमित शाह म्हणाले.
दरम्यान, बिहारमध्ये आम्ही नितीश कुमार यांच्या कमी जागा येऊनही ठरल्याप्रमाणे त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं. नितीश कुमार यांनी भाजपचा मुख्यमंत्री करा असं म्हटलं होतं तरी आम्ही शब्द पाळला. आज नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत, असंही अमित शहा यांनी म्हटलं आहे .
महत्वाच्या घडामोडी
“नारायण राणेंचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे निव्वळ विनोद, त्याकडे फारसं लक्ष देऊ नका”
मुंबईमध्ये भाजपला अजून एक झटका; अजून एका नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
सचिन तेंडुलकरने आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी- शरद पवार
राज्यात शिवसेना-भाजपचं सरकार असताना औरंगाबादचं संभाजीनगर का झालं नाही?- राज ठाकरे