नवी दिल्ली : शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीचं अद्याप ठरलेलं नाही. शिवसेनेने राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला असला, तरी अद्याप आवश्यक संख्याबळ त्यांच्याकडे नाही. त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने काही अटी शर्थी ठेवल्या आहेत.
या आहेत प्रमुख अटी-
काँग्रेसने 11 मंत्रिपदं, विधानसभा अध्यक्षपद आणि किमान समान कार्यक्रम अशा प्रमुख अटी ठेवल्या आहेत. तसचं ठाकरे कुटुंबातील शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. जर मुख्यमंत्री ठाकरे कुटुंबातील असेल तर रिमोट कंट्रोल त्यांच्याकडे असेल अशी काँग्रेसची धारणा आहे.
महापालिका निवडणुकांसाठी फॉर्म्युला तयार करणे, महामंडळांमध्येही काँग्रेसला वाटा हवा, राष्ट्रवादीकडे चावी आणि काँग्रेसकडे स्वतंत्र ब्रेक सिस्टिम असावी. काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांचं बाहेरुन पाठिंबा देण्यापेक्षा थेट सत्तेत सहभागी होण्याचं मत आहे. अश्या प्रमुख अटी काँग्रेसने ठेवल्या आहेत.