मुंबई : अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी अखेर राजीनामा दिला. पण आता प्रश्न उरतो की, नवा वसूली मंत्री कोण? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. याला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.
ताईंचा नवरा स्वतः भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत नवीन वसुली मंत्री कोण?? अहो ताई भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की अंगलट आलं की परत ‘पवार साहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत’ हे म्हणायची वेळ येईल. थोडा धीरज रखो , सब सच सामने आयेगा.!!, असं म्हणत चाकणकर यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. आता यावर चित्रा वाघ यांनी ट्विट करत चाकणकर यांना चांगलंच सुनावलं आहे.
अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर व त्यातही आवाज उठवणारी जर स्त्री असेल तर
व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी “ही”मंडळी भ्याडच म्हणावी लागतील सूडाच्या भावनेतून होणारं राजकारण फार काळ टिकणारं नाही हे लक्षात ठेवा, असं म्हणत चित्रा वाघ यांनी चाकणकर यांचं नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर व त्यातही आवाज उठवणारी जर स्त्री असेल
तर
व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी “ही”मंडळी भ्याडच म्हणावी लागतीलसूडाच्या भावनेतून होणारं राजकारण फार काळ टिकणारं नाही हे लक्षात ठेवा
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 7, 2021
महत्वाच्या घडामोडी –
बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत- अनिल परब
मागेल त्याला ‘कोरोना व्हॅक्सिन’ द्या; अशोक चव्हाण यांची मागणी
‘कोरोना लसींबाबत केंद्राशी चर्चा करा, माध्यमांशी बोलून हात झटकणं बंद करा- देवेंद्र फडणवीस
केंद्र सरकार देशाला कोरोनाच्या खाईत ढकलत आहे- नाना पटोले