आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्य मंत्रिमंडळातल्या चार मंत्र्यांबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी रंगली आहे.
राज्य मंत्रिमंडळातले चार मंत्री भ्रष्ट आणि अकार्यक्षम आहेत, त्यामुळे त्यांना काढण्यासाठी भाजपच्या हायकमांडनं दबाव आणल्याची, माहिती संजय राऊतांनी जाहीर केली. तसेच त्या मंत्र्यांची नावं माहित असल्याचा दावाही संजय राऊतांनी यावेळी केला.
ही बातमी पण वाचा : “शिंदे फडणवीस सरकारला थोडी तरी लाज वाटते का?”
‘चार मंत्र्यांना काढा ते भ्रष्ट आहेत, अकार्यक्षम आहेत. या चार मंत्र्यांची नावं माझ्याकडे आहेत. भाजपच्या हायकमांडने या सो कॉल्ड शिवसेनेवर दबाव आणला आहे,’ असा आरोप संजय राऊतांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
“राज्यात ४५ हून अधिक जागा भाजप-शिवसेना युतीला मिळतील”
“आनंद दीघेंच्या मृत्यूबाबत, ठाकरे गटाच्या खासदाराचा गंभीर आरोप, म्हणाले. …ते शिंदेंचं कारस्थान…”