मुंबई : रायगड जिल्ह्यात सध्या अनेक कारखाने येत आहेत. त्यामुळे भविष्यात रायगड जिल्ह्यात शेती शिल्लक राहील की नाही, अशी शंका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. रविवारी पनवेलच्या व्ही.के. हायस्कूलच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते.
रायगड जिल्ह्यात अनेकप्रकारचे कारखाने येत असल्यामुळे भविष्यात याठिकाणी शेती शिल्लक राहील की नाही, याबद्दल शंका आहे. अशा परिस्थितीत तरुण पिढीला गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासोबत गुणवत्ताही वाढली पाहिजे, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि व्ही.के. हायस्कुलचे माजी विद्यार्थी मनोहर जोशीही उपस्थित होते. यावेळी त्यांनीही उपस्थितांना संबोधित केलं.
निवडणुकीतील भाषणापेक्षा शिक्षण ही महत्वाची गोष्ट आहे. निवडणुकीत निवडून येणं सोप असतं, पण प्रत्येक वर्गात पास होणे, ही कठीण गोष्ट असंत असं जोशी यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
-अमृता फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला, म्हणतात…
-सत्तांतर झालं असलं तरी शिवसेना आणि भाजपचं रक्त एक आहे- चंद्रकांत पाटील
-उद्धव ठाकरे हे केवळ नामधारी मुख्यमंत्री- नारायण राणे
-ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; नवीन वर्षात ‘हा’ होणार बदल