मुंबई : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर काँग्रेस नेते व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वांच्या सहकार्यानं सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडली. महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टात बाजू मांडली त्यात समन्वयाचा अभाव कधीही नव्हता, असं अशोक चव्हाण म्हणाले. तसेच 102 व्या घटनादुरुस्तीनंतर राज्याला अधिकार राहिलेला नाही, असं सुप्रीम कोर्टानं निक्षून सांगितलेलं आहे., असं अशोक चव्हाण म्हणाले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार नसताना कायदा केला होता. त्यानंतर आता फसवणूक केली जात आहे. मराठा आरक्षणाचा कायदा 102 व्या घटनादुरुस्तीनंतर केल्यानं सुप्रीम कोर्टानं रद्द केला, असं अशोक चव्हाण यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, फडणवीस सरकारनं जे वकील लावले होते. तेच वकील महाविकासआघाडी सरकारनं लावले होते. फडणवीस यांच्या काळात जितक्या बैठका घेतल्या नसतील तितक्या बैठका घेतल्या गेल्या, असंही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
मराठा आरक्षण! “गनिमी कावा करा”; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला
मराठा बांधवांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल- अजित पवार
“शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश”
मराठा समाजाच्या दृष्टीने हा अत्यंत दुर्दैवी दिवस- संभाजीराजे भोसले