Home महाराष्ट्र …त्यामुळे विरोधकांनी शरद पवारांना बळीचा बकरा बनवू नये- रामदास आठवले

…त्यामुळे विरोधकांनी शरद पवारांना बळीचा बकरा बनवू नये- रामदास आठवले

मुंबई : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्यानंतर गांधी कुटुबीयांची भेट घेतल्यामुळे शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून उभं केलं जाणार असल्याचीही चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलं होतं. यावर आता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विरोधक हे शरद पवारांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून पुढे करत आहेत. पवार लढायला तयार असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असं रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, शरद पवार या निवडणुकीत विरोधकांच्या ताकदीवर निवडून येणार नाहीत. त्यामुळं त्यांचा विरोधकांनी बळीचा बकरा करू नये, असं मत रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केलं.

महत्वाच्या घडामोडी –

“मुंबईत झोपड्या जमीनदोस्त करण्यास सुरूवात; अतुल भातखळकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात”

राजकीय सूडाचा आरोप करणाऱ्यांना ही चपराक- प्रवीण दरेकर

मुंबईत मनसेला धक्का, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकरांचा शिवसेनेत प्रवेश

“ठाकरे सरकार हँग झालंय, त्यामुळे…”; दहावीच्या निकालावरून अतुल भातखळकरांचा हल्लाबोल