Home महाराष्ट्र राजकीय सूडाचा आरोप करणाऱ्यांना ही चपराक- प्रवीण दरेकर

राजकीय सूडाचा आरोप करणाऱ्यांना ही चपराक- प्रवीण दरेकर

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालकीच्या 4 कोटी 20 लाख रुपये किंमतीच्या दोन मालमत्तांवर आज ईडीनं जप्तीची कारवाई केली. या कारवाईनंतर भाजपाकडून आता महाराष्ट्र सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर  राज्यातील सत्ताधाऱ्यांना निशाणा साधलाय.

राजकीय सूडापोटी केंद्र सरकार आणि एजन्सी काम करतायत असं बोलणाऱ्यांना ही चपराक आहे. जर तपासात मालमत्ता जप्त झाली, याचा अर्थ त्या तपासात तथ्य आहे. अशा कोणत्याही यंत्रणेला मनमानी करता येत नाही, असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत

दरम्यान, आता भाजपावर, केंद्रावर आणि तपास यंत्रणांवर आरोप करणाऱ्यांचं समाधान होईल. आता या प्रकरणात सत्यता असल्याचं दिसून आलं आहे. भविष्यात यातील तथ्य आणि सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीत, असंही प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

मुंबईत मनसेला धक्का, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकरांचा शिवसेनेत प्रवेश

“ठाकरे सरकार हँग झालंय, त्यामुळे…”; दहावीच्या निकालावरून अतुल भातखळकरांचा हल्लाबोल

“पंकजा मुंडेंची नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे”

“देशमुखांची आज ईडीने 4 कोटीची संपत्ती जप्त केली, हळू हळू 100 कोटींची मालमत्ता जप्त होणार”