मुंबई : राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा अशा शब्दांत शिवसेनेने मोदी सरकारवर टीका केली होती. या टीकेला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सामनाकार बोरुबहाद्दर संजय राऊत आणि अर्थशास्त्र याचा काडीचाही संबंध नाही. संबंध असल्याच तर टक्केवारीशी आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या भाव वाढीवरून त्यांना राम मंदिराचा चंदा आठवला, काँग्रेसमुळे वाण नाही पण गुण राऊतांना नक्की लागला आहे, असं अतुल भातखळकर म्हणाले.
पेट्रोल डिझेलच्या दरात 26 रुपये व्हॅट राज्य सरकारचा आहे तो कमी करा. ममता बॅनर्जींचं एवढं तरी ऐका आणि मग मोदींवर टीका करा. मोदी जो टॅक्स गोळा करत आहेत त्यातील 41 टक्के तुम्हाला मिळतो आहे. त्यामुळे लोकांना विनाकारण भरकटवायचं आणि खोटं बोलायचे उद्योग आता बोरुबहाद्दर संजय राऊत यांनी बंद करावे.” असंही भातखळकर यांनी म्हटलं आहे.
सामना, संजय राऊत आणि अर्थशास्त्राचा जसा काडीचाही संबंध नाही तसा पेट्रोलच्या दराचा आणि रामवर्गणीचाही संबंध नाही.
पेट्रोल दरवाढीवर बोलण्याआधी राज्य सरकारने आकारलेला 26 टक्के VAT तर कमी करा. pic.twitter.com/XDpAxaJhli— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 22, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“मध्यप्रदेश हादरलं! भाजपच्या पदाधिकाऱ्यासह चाैघांनी 20 वर्षाच्या तरूणीवर केला बलात्कार”
माझं महाराष्ट्रातील जनतेला कळकळीचं आवाहन की…; राजेश टोपे यांच रुग्णालयातून पत्र
गैरजबाबदार असा पुरस्कार शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना दिला पाहिजे- किरीट सोमय्या
…म्हणून महाराष्ट्रात परत लॉकडाऊन; निलेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका