Home महाराष्ट्र संभाजीराजेंची हेरगिरी करण्याचा प्रश्नच नाही- दिलीप वळसे पाटील

संभाजीराजेंची हेरगिरी करण्याचा प्रश्नच नाही- दिलीप वळसे पाटील

मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं असताना खासदार संभाजीराजे छत्रपती राज्य सरकारकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचं ट्वीट केलं होतं. त्यावर आता गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय.

छत्रपती संभाजी राजेंवर पाळत ठेवण्याचा किंवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यांदरम्यान कोणतीही सामाजिक अपप्रवृत्ती त्यांच्या कार्यक्रमात विघ्न आणू नये म्हणून पुरेसा बंदोबस्त सिंधुदुर्ग दौऱ्यात नेमण्यात आला होता, असं दिलीप वळसे- पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही. पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?,  असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं  होतं.

महत्वाच्या घडामोडी –

मराठ्यांना आरक्षण मिळावे या मताचे उद्धव ठाकरे कधीच नव्हते- नारायण राणे

सरकारला लाथा घातल्याशिवाय जाग येत नाही; EWS आरक्षणावरून विनायक मेटेंचा घणाघात

मराठा आरक्षणाच्या जबाबदारीतून पळ काढू नका; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला टोला

‘या’ कारणामुळं भाजप आमदार महेश लांडगे यांच्यासह 60 जणांविरोधात गुन्हा दाखल