मुंबई : गेली अनेक वर्षे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष सुरू असताना मी शिवसेनेत असल्यापासून मराठ्यांना आरक्षण मिळावे, या मताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीच नव्हते, असं म्हणत भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. ठाण्यात भाजपने पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.
सरकारने खटला चालविण्यात टाळाटाळ करून तारखा मागितल्या, गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या परिशिष्टाचे इंग्रजीत भाषांतर करून दिले नाही आणि त्यामुळे आयोग एकतर्फी असल्याचा समज निर्माण झाला, अशा अनेक चुका महाविकास आघाडी सरकारने केल्या आहेत. तसेच मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी सर्व्हे केला. मात्र सर्व्हे राज्य सरकारने करणे गरजेचे आहे, असं नारायण राणे म्हणाले आहेत.
मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी महाविकास आघाडीने आता तरी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकारने काही सवलती दिल्या होत्या, तशा शिक्षण आणि रोजगारासाठीच्या सवलती मराठा समाजाला द्याव्यात आणि त्यासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे, असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
सरकारला लाथा घातल्याशिवाय जाग येत नाही; EWS आरक्षणावरून विनायक मेटेंचा घणाघात
मराठा आरक्षणाच्या जबाबदारीतून पळ काढू नका; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला टोला
‘या’ कारणामुळं भाजप आमदार महेश लांडगे यांच्यासह 60 जणांविरोधात गुन्हा दाखल
सरकार माझ्यावर पाळत ठेवतंय; संभाजीराजे यांचा खळबळजनक आरोप!