आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी विराजमान श्रीगणरायाचे दर्शन घेतले. यानंतर भाजपच्याही अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनसे-भाजप युती होणार, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनसेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सोबत घेण्याची अजिबात आवश्यकता नाही, असा सल्ला रामदास आठवलेंनी यावेळी भाजपला दिला.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेनेचा ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर?
रिपब्लिकन पक्ष हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे. मागच्या वेळेला बीजेपी आणि आरपीआय एकत्र असताना 82 जागा आणि निवडून आणल्या त्यामुळे मेजॉरिटी 227 जागा पैकी 114 पेक्षा जास्त जागा निवडून आणणार मध्ये आपल्याला काही अडचणी येणार नाही, असं आठवले म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरेंना सोबत घेतलं तर भाजपचे नुकसान होऊ शकतं., असंही आठवले म्हणाले. उत्तर भारतीयांची मतं आहेत, गुजराती मत आहेत, साउथ इंडियन ची मत आहेत, ही मतं आपल्याला मिळणार नाहीत. त्यामुळे आपला तोटा होण्याची शक्यता आहे. माझी भुमिका अशी आहे की, राज ठाकरे यांना सोबत घेण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. रिपब्लिकन पक्ष ताकदीने भाजपच्या पाठी उभा आहे., असंही आठवलेंनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिवसेना-शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या वादात बच्चू कडूंची उडी, म्हणाले…
दु:खद बातमी! मनसे परभणी शहर अध्यक्षांवर जीवघेणा हल्ला, हल्ल्यात त्यांची प्राणज्योत मालवली”