आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई | महाराष्ट्रात रविवारी 2 जुलैला मोठा राजकीय भूकंप घडला.राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह आठ आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २३ वर्षे काम केलेले आणि बीआरएस पक्षाचे नेते कदीर मौलाना यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केलेत.
राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. अजित पवार महाविकास आघाडीतून भाजपसोबत गेले आहे. हे अचानक घडलेलं नाही हे सर्व ठरवून घडलेले आहे. हे सर्व काही स्क्रिप्टेड आहे. ही सगळी राजकीय ऍडजस्टमेंट आहे, असं कदीर मौलाना म्हणाले आहेत.
ही बातमी पण वाचा : ” ‘या’ गोष्टीसाठी, शरद पवारांचे अत्यंत विश्वासू प्रफुल्ल पटेल यांनी केला पवारांचा विश्वासघात
एक दिवसापूर्वी राज्याच्या राजकारणामध्ये भूकंप झाला. मात्र हा भूकंप नसून पवार घराण्याने घडवून आणलेले हे कट कारस्थान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा राष्ट्रवादीने केल्याचे वक्तव्य केले होते. यामुळे यांना तुरुंगात जाण्याची भीती होती. म्हणून हे सगळं ठरवून झाले आहे, असंही कदीर मौलाना यांनी म्हटलं आहे.
मी पक्षात होतो. पवार घराण्याची माझे चांगले संबंध होते. त्यामुळे हे मला माहिती आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची शकुनी मामाची भूमिका आहे, असा घणाघातही बीआरएस पक्षाचे नेते कदीर मौलाना यांनी यावेळी केला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिंदे जर मुख्यमंत्री असतील, तर मला मंत्रीपदही नको; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा खळबळजनक दावा
“आता ठाकरे बंधू एकत्र येणार?; मनसेच्या बैठकीत मनसैनिकांचा राज ठाकरेंसमोरच सूर”
अजित पवारांना मोठा धक्का! अमोल कोल्हेंनी केली भूमिका स्पष्ट; म्हणाले…मी शरद पवारांसोबत