महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष टिकेल यात शंका नाही- शरद पवार

0
328

मुंबई : मला महाराष्ट्राची माहिती आहे. सरकारबद्दल कुणाला काही म्हणायचं आहे ते म्हणू दे, त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष टिकेल यात शंका नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

शिमगा नुकताच संपला आहे. त्यामुळे अजुन कुठला मुहूर्त विरोधकांना शिल्लक राहिलेला नाही. असं मला वाटतं, असं म्हणत शरद पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. शरद पवार यांनी बुधवारी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर विधीमंडळ माध्यमांशी ते बोलत होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे चांगलं आणि सर्वांना घेवून काम करत आहेत, असं म्हणत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची स्तुती केली.

महत्वाच्या घडामोडी-

” गो कोरोना नाही, तर मग काय कम कोरोना असं म्हणू का?”

तुम्ही जेव्हा हाफ चड्डी घालायला शिकला तेव्हापासून शरद पवार फूल पॅण्ट वापरतात; राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा

उद्धव ठाकरे लवकरच परत येतील आणि राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल – रामदास आठवले

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही माफ होणार; सरकारचा मोठा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here