Home महत्वाच्या बातम्या “राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार यात शंका नाही”

“राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार यात शंका नाही”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज पुन्हा केंद्रीय गृहमंत्री व देशाचे नवे सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली.यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं भाकित केलं आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा एकत्र येणार यात काहीच शंका नाही. जसं लष्करी हल्ला किंवा माघार घेताना कव्हर फायर देतात, तोच प्रकार आपण आज पाहिला. नवाब मलिक यांची पत्रकार परिषद फक्त पवार-शाह भेटीला कव्हर-अप करण्यासाठी होती. बहुतेक ठाकरेंना दाखवायला की आम्ही भाजपाविरुद्धच आहोत, असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

दरम्यान, अंजली दमानिया यांच्या या ट्वीटनंतर पुन्हा एकदा भाजपा-राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

सामान्य मुंबईकरांना छळण्यात ठाकरे सरकारला कसा विकृत आनंद मिळतो हे दिसलं- केशव उपाध्ये

नवाब मलिकांनी राज्यापालांच्या दाैऱ्यावर बोलण्यापेक्षा…; प्रवीण दरेकरांचा नवाब मलिकांना सल्ला

खावाले काळ, नी भूईले भार म्हणजे ठाकरे सरकार’; आशिष शेलारांचा घणाघात

शिवसेनेला सोडचिठ्ठी देत ‘या’ माजी राज्यमंत्र्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश!