मुंबई : मुंबईसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना सरकारची स्थिती अनिर्णायकी आहे. मंत्रिमंडळातील मंत्री काय करतात याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्ता नसतो तर मुख्यमंत्री काय सांगतात त्याकडे मंत्र्यांचे लक्ष नसते, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
करोनाचं संकट हाताळताना आम्हाला कोणत्याही प्रकारे सरकारवर टीका करायची नाही. उलट सरकारला आमचा पाठिंबा आहे. परंतु कोणताही निर्णय घेताना मंत्र्यांमध्ये समन्वय हवा आहे. पण, दुर्दैवानं समन्वय दिसत नाही. देशातील अन्य कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण जास्त आहेत. मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशावेळी समन्वयातून काम होणे गरजेचं आहे, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, डॉक्टर व परिचारिकांना करोना संरक्षित पुरेसे ड्रेस नाहीत. त्यांना सकस आहार दिला जात नसल्याच्या तक्रारी आहेत. खासगी डॉक्टरांना दवाखाने उघडे ठेवण्याबाबत सक्ती केली जाते मात्र त्यांना मास्क अथवा आवश्यक सुरक्षा साहित्य कोण देणार वा कुठे मिळेल तसेच त्यांनी रुग्ण तपासताना कोणती काळजी घ्यायची याची कोणतही माहिती दिली जात नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
आव्हाड साहेब तुम्ही योग्यच केलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत- रुपाली चाकणकर
मारहाण झालेल्या ‘त्या’ तरुणाला भेटण्यासाठी मला जाऊन देत नाहीत- किरीट सोमय्या
मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना भाजपने विचारले ‘हे’ चार प्रश्न!
मारहण प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांनी अखेर सोडलं मौन, म्हणाले…