Home महाराष्ट्र मारहण प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांनी अखेर सोडलं मौन, म्हणाले…

मारहण प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांनी अखेर सोडलं मौन, म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अभियंत्याला बेदम मारहण केल्याचा आरोप होत आहे. त्यावरून कालपासून बरीच चर्चा सुरू आहे. अनेक नेत्यांनी अगदी त्यांचा राजीनामा घेण्याचीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मात्र या प्रकरणावर आव्हाडांनी अखेर मौन सोडलं आहे.

खरं तर त्याला ज्यावेळेस मारहाण झाली त्यावेळी मी माझ्या कामात व्यस्त होतो. मी मारहाण झालेल्या ठिकाणी नव्हतो. गेल्या 24 तासांपासून मी माझ्या मतदारसंघात आणि सोलापूरमधला आढावा घेण्यात व्यस्त आहे. या अभियंत्याला मारहाण झाल्याचं मला सोशल मीडियावरूनच कळलं, असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.

हा अभियंता गेल्या तीन वर्षांपासून माझ्या विरोधात नको त्या पोस्ट करत असतो. माझ्या कार्यकर्त्यांनी ही गोष्ट माझ्या अनेकदा लक्षात आणून दिली. पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. खरं तर तो केव्हाच गजाआड जायला हवा होता. पण मीच त्याकडे दुर्लक्ष केलं, असंही आव्हाड म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

जितेंद्र आव्हाडांना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करा; देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बंगल्यावर नेऊन अभियंत्याला बेदम मारहाण; जितेंद्र आव्हाडांवर आरोप

तुमच्या सर्व निर्णयांना आमचा पाठिंबा; देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

“मूर्खांन सोबत सरकार चालवता चालवता अजित पवारांना लोकं पण मूर्ख वाटायला लागली की काय?”