Home महाराष्ट्र खुजगाव ग्रामपंचायत निडणुकीमधे “शिट्टी” वाजण्याची दाट शक्यता…

खुजगाव ग्रामपंचायत निडणुकीमधे “शिट्टी” वाजण्याची दाट शक्यता…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : सध्या ग्रामपंचायतीची रणधुमाळी चालू आहे. अशातच सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी हाय व्होल्टेज लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सावर्डे, मनोराजुरी, कुमठे येथे मोठी रंगत आहे. वायफळे, निमणी, येथे चौरंगी लढत होत आहे. तर खुजगाव मधे किसान काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष जोतीराम जाधव सरपंच उमेदवारीत असल्याने तेथे सुद्धा हाय होल्टेज लढत आहे.

गेली १० वर्षे केलेली विकास कामे, आणलेला निधी , ऊस बिल, पिण्याचे पाणी, कर्जमाफी , दूध फॅट साठी आंदोलन, द्राक्ष बिल साठी लढा यामुळे शेतकऱ्यांचे ढान्या वाघ अशी त्यांची ओळख आहे.

हे ही वाचा : हिवाळी अधिवेशनानंतर शिंदे-भाजप सरकार कोसळणार; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

अशातच ते उमेदवार असल्याने विरोधकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. जोतीराम जाधव हे निष्कलंक व प्रामाणिकते साठी प्रसिद्ध आहेत. गावात मोठ्या प्रमाणात निधी आणला पण कधी टक्केवरी च गणित त्यांना जमल नाही. पद दिल नाही म्हणून त्यांनी कधी कुठल्या गटाला, पक्षाला रामराम केला नाही हे दोन मुद्दे सध्या गावात चर्चेत आहेत.

दरम्यान, खोटा अपप्रचार, पैसे वाटणे, असले प्रकार चालू असले तरी खुजगावर जोतीराम जाधव यांनी गावासाठी केलेल्या संघर्षाची जाणीव ठेवून त्यांच्या पारङ्यात कौल देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मनसेतून हकालपट्टी झाल्यानंतर, वसंत मोरेंच्या ‘या’ कट्टर समर्थकानं शिंदे गटात केला प्रवेश”

“उद्धव ठाकरेंची मोठी खेळी; शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्यांनी पुन्हा ठाकरे गटात केली घरवापसी”

नितेश राणे, तुम्ही आमच्या भानगडीत पडू नका, अन्यथा…; मनसेचं, राणेंना जोरदार प्रत्युत्तर