Home महाराष्ट्र “उद्धव ठाकरेंची मोठी खेळी; शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्यांनी पुन्हा ठाकरे...

“उद्धव ठाकरेंची मोठी खेळी; शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्यांनी पुन्हा ठाकरे गटात केली घरवापसी”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 व अपक्ष 10 आमदारांसोबत बंड केलं. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि शिंदेंनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर शिवसेनेतील अनेक नेत्यांचा शिंदे सरकारमध्ये जाण्याचा कल वाढला. त्यामुळे शिवसेनेत मोठी फूट निर्माण झाली. मात्र त्यानंतर आता ठाकरे गटात जोरदार इनकमिंग सूरू झालं आहे.

अशातच आता काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केलेल्या ठाकरेंच्या शिवसैनिकांनी पुन्हा एकदा ठाकरे गटात गृहवापसी केली आहे.

हे ही वाचा : नितेश राणे, तुम्ही आमच्या भानगडीत पडू नका, अन्यथा…; मनसेचं, राणेंना जोरदार प्रत्युत्तर

शिवसेनेत बंड झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातील पडेगाव येथील पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. या सर्व पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेत गृहवापसी केली आहे.

पडेगाव, मिटमिटा भागातील शिवसेनेचे उपशहरप्रमुख अंबादास म्हस्के, माजी नगरसेवक हिरालाल वाणी, शाखाप्रमुख प्रकाश दुबिले, नवनाथ मुळे, किसन कणसे, किरण पेरकर, गोविंद खांड्रे, ग्रामपंचायत सदस्य माळीवाडा कृष्णा मुळे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. या सर्व शिवसैनिकांनी आज शिंदे गटाला धक्का देत पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

“उद्धव ठाकरेंची यशस्वी खेळी; राष्ट्रवादी व भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

बोम्मईंच्या ट्विटबाबत अमित शहांशी चर्चा; बैठकीत नेमकं काय घडलं; मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

पुण्यातील बंद बेकायदेशीर, खासदार उदयनराजे भोसलेंना अटक करा; अॅड. गुणरत्न सदावर्तेंची मागणी