…मग तुम्ही कुटुंबात कलह का निर्माण करत आहात?; संजय राऊतांचा सवाल

0
191

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ आणखी इममॅच्युअर आहे, त्याच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही अशा शब्दात शरद पवार यांनी पार्थ पवारांचा समाचार घेत त्यांना फटकारलं असून त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पार्थ पवार हे पक्षाचे प्रवक्ते नाहीत, प्रमुख नेते नाहीत. त्यांचे वडील अजित पवार प्रमुख नेते आहेत. अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील काही बोलत आहेत का ? मग तुम्ही कुटुंबात कलह का निर्माण करत आहात?”.असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना केला.

राजकीय विधान केल्यानेच शरद पवार यांनी राजकीय उत्तर दिलं असेल, शरद पवारांचं कोणतंही विधान निरर्थक नसतं हे समजून घेतलं पाहिजे. त्यांचा अनुभव, ज्येष्ठता पाहता मीडियाने या वादात पडू नये असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सामना कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी-

प्रामाणिक करदात्यांना मोदी सरकारचा मोठा दिलासा; उचललं ‘हे’ मोठं पाऊल

“एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं”

“रशियानंतर आता ‘या’ देशानं बनवली कोरोना लस; लवकरच होणार घोषणा”

“पार्थला फटकारल्यानंतर अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here