Home विदेश “रशियानंतर आता ‘या’ देशानं बनवली कोरोना लस; लवकरच होणार घोषणा”

“रशियानंतर आता ‘या’ देशानं बनवली कोरोना लस; लवकरच होणार घोषणा”

बिजींग : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगात कोरोनाचं संक्रमण वाढत असताना रशियाने कोरोनाची लस बनविल्याची दावा केला आहे. यानंतर आता चीनच्या सिनोव्हॅक बायोटेक लसीने मानवी चाचणीचा अंतिम टप्पा सुरू केला आहे.

तसेच येत्या काही दिवसांत चीन लशीसंदर्भात घोषणा करणार आहे, अशी माहिती कळाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मांडलेल्या म्हणण्यानुसार, सिनोव्हॅक ही लस सात प्रमुख लसींपैकी प्रमुख एक अशी लस आहे.

इंडोनेशियाच्या सरकारी मालकीच्या बायो फार्माच्या मदतीने ही लस तयार केली जात आहे. इंडोनेशिया या देशातील जवळपास दीड हजार रूग्णांवर या लशीची चाचणी केली जात आहे. सिनोव्हॅक या लशीचा दुसरा महत्त्वाचा टप्पा सुरक्षित पार पडला आहे.

दरम्यान, इंडोनेशियात सिनोव्हॅक या लशीचे ट्रायल सध्या तिसर्‍या टप्प्यात आहे. ही लस अंतिम टप्प्यात पोहचलेल्या अंतिम लशींपैकी एक आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“पार्थला फटकारल्यानंतर अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट”

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

महापौर साहेब इंग्रज होऊ नका, गणेश विसर्जन घाटावरच करणार; पुण्यामध्ये मनसे आक्रमक

राज्यातील कोविड रुग्णालये कॅशलेस करा; नितेश राणेंची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी