आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर ‘शिवसेना’ पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह यावरून दोन गटात वाद सुरू आहे. याआधीच निवडणूक आयोगानं मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असेल, असा निर्णय दिला आहे. या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे मूळ शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह कुणाचं याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. असं असताना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
तांत्रिक अडचण आली तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवू, असं विधान किशोर पाटील यांनी केलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
ही बातमी पण वाचा : “जयंत पाटील, अजित दादांसोबत जाणार?; कालच्या गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?”
महाराष्ट्रात ‘धनुष्यबाण’ आणि ‘शिवसेना’ आमचीच आहे, हे सिद्ध झालं आहे. हे निवडणूक आयोगानंही जाहीर केलं आहे. त्यामुळे ९९.९ टक्के भाजपाच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढण्याची आमच्यावर वेळ येणार नाही. पण जर तांत्रिक अडचण निर्माण झाली, तर कदाचित तसा निर्णय होऊ शकतो, असं किशोर पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी जर उद्या सांगितलं की, आपल्या सर्वांना अपक्ष निवडणूक लढायची आहे, तर आम्ही अपक्ष निवडणूक लढवू. एकनाथ शिंदेंनी सांगितलं की, आपल्याला भाजपाकडून लढायचं आहे, तर आम्ही भाजपाकडून लढू. आमचे सर्व निर्णय आमचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे घेतील. ते जसं सांगतील, तसंच सगळं होईल”, असंही किशोर पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
तब्बल 1 वर्ष, 5 महिन्यांनी नवाब मलिकांना जामीन मंजूर; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
अमित शहांनी संसदेत मूर्खपणा केला, एवढ्या मोठ्या नेत्यांनी…; बच्चू कडूंचं मोठं विधान
मोठी बातमी! ‘या’ कारणासाठी ठाकरे – शिंदे गट आले पुन्हा एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण