…तर उद्याचा सूर्य राष्ट्रवादीचा असेल- जयंत पाटील

0
609

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हयातील राजुरा विधानसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमांतर्गत आढावा बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

“आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, तर संघर्ष करा. संघर्षाशिवाय गत्यंतर नाही. या संघर्षातून तुम्ही मार्ग काढला, तर उद्याचा सूर्य राष्ट्रवादीचा असेल”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

अनेक जण पक्ष सोडून गेले मात्र आजही राष्ट्रवादी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता राजुरामध्ये पक्षासाठी काम करतोय. राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारचा घटक पक्ष आहे. पण तरीही आपण पक्ष वाढविण्यासाठी आता कंबर कसली पाहिजे. अनेक जण पक्षात येण्यास इच्छुक असतात. अशा लोकांना पक्षात येण्यास प्रोत्साहित करा, पक्षाची बूथ कमिटी मजबूत करा आणि संपर्क वाढवा”, असं आवाहनही जयंत पाटील यांनी यावेळी केलं.

महत्वाच्या घडामोडी-

…तर आम्ही राज ठाकरेंना नक्की मार्गदर्शन करू- संजय राऊत

अखेर ठरलं! ‘या’ दिवसापासून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

रेणू शर्मा यांच्यानंतर आता धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वादही मिटण्याच्या मार्गावर

सेक्स कोणासोबत करणार हे 24 तास आधी पोलिसांना कळवा; ‘त्या’ न्यायालयाचा अजब निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here