आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : त्रिपुरातील कथित घटनेच्या निषेधार्थ राज्यातील अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. या तिन्ही शहरात मुस्लिम समाजाकडून निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोर्चावेळी आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला होता.
हे ही वाचा : “औरंगाबादेत शिवसेनेचा मोर्चा; मनसेची टीका, मोर्चाचे सोंग करण्यापेक्षा…”
रझा अकादमी हे भाजपचेच पिल्लू आहे. त्यामुळे त्यांच्याच पाठिंब्याने त्रिपुरातले लोण महाराष्ट्रात पोहोचले आहे. अन्यथा तिकडे त्रिपुरात घडलेल्या दंगलींचे पडसाद इथे पडण्याचे काय कारण, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना उपस्थित केला होता. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत यांचं वक्तव्य ऐकुण मला कीव येते. राजकारणासाठी किती लाचार व्हाल. आज बाळासाहेब ह्यात असते, तर त्यांनी राऊतांच्या एक थोबाडीत दिली असती, असा हल्लाबोल चंद्रकांत पाटलांनी यावेळी केला. ते नाशिकमध्ये बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
कराडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा बायका-पोरांसह मोर्चा
औरंगाबादेत वाढत्या महागाई विरोधात आज शिवसेनेचा मोर्चा; संजय राऊत करणार नेतृत्व
“खोत आणि पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांना भडकावलं आहे, वेळ आल्यावर त्यांनाही बघू”