Home महाराष्ट्र कराडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा बायका-पोरांसह मोर्चा

कराडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा बायका-पोरांसह मोर्चा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कराड : राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन पुकारले आहे. अशातच आता एसटी एसटी कर्मचाऱ्यांनी कराडामध्ये बायका-पोरांसह तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला.

हे ही वाचा : औरंगाबादेत वाढत्या महागाई विरोधात आज शिवसेनेचा मोर्चा; संजय राऊत करणार नेतृत्व

एसटी आमच्या घामाची, नाही कुणाच्या बापाची…, कोण म्हणतो देत न्हाय, घेतल्याशिवाय रहात नाय…, एसटीचे राज्य शासनात विलगीकरणीकरण झालेच पाहिजे, अशा घोषणा देत एसटी कर्मचाऱ्यांनी काल कराडामध्ये त बायका-पोरांसह तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. तहसिलदारांना निवेदन देण्यात आलं. आंदोलकांच्या मागण्यांबाबत निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा निर्धार कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, मोर्चा दत्त चौकात पोचल्यावर पोलिसांनी मोर्चा अडवला. कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार विजय पवार यांना निवेदन दिले. मोर्चा दत्त चौकातून पुन्हा एसटी बसस्थानकाबाहेर नेण्यात आला. या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“खोत आणि पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांना भडकावलं आहे, वेळ आल्यावर त्यांनाही बघू”

राष्ट्रवादीचे टायमिंग चुकलं; बहुमत नसतानाही भाजपाने ही निवडणूक बिनविरोध जिंकली

राष्ट्रवादीचे टायमिंग चुकलं; बहुमत नसतानाही भाजपाने ही निवडणूक बिनविरोध जिंकली