आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. अजूनही स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. याच पार्श्वभूमीवर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य शिवसैनिकांच्या भावना जाणून घेत आहेत. यावरून आता शिंदे गटातील बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या शाखांना भेटी द्याव्या लागतं, यासारखं दुसरं दुर्दैव आज नाही. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आधीच असे दौरे करून शिवसैनिकांच्या भावना जाणून घेतल्या असत्या तर कदाचित ही वेळ आली नसती., असं म्हणत गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
हे ही वाचा : आज अजित पवारांचा वाढदिवस, अन् रोहित पवारांनी अशा दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले…
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे आजारी होते. मात्र आदित्य ठाकरे हे तर तरुण होते. त्यांनी तरी राज्याचे दौरे करायला हवे होते. मात्र आता सत्ता गेल्यानंतर ते संपूर्ण राज्यात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून फिरत आहेत. आदित्य यांनी आधीच सर्व जिल्ह्यांचे दौरे केले असते तर कदाचित आज ही वेळ आली नसती, असंही गुलाबराव पाटील यांनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
“आता काँग्रेसच्या 20 माजी नगरसेवकांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण”
“ठाकरे कुटुंब आणि शिवसेना हेच आपले पंढरपूर आणि पांडुरंग”
“द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती; महाविकास आघाडीची तब्बल ‘एवढी’ मतं फुटली”