Home महाराष्ट्र “ठाकरे कुटुंब आणि शिवसेना हेच आपले पंढरपूर आणि पांडुरंग”

“ठाकरे कुटुंब आणि शिवसेना हेच आपले पंढरपूर आणि पांडुरंग”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : शिवसेनेत उभी फूट पडून 40 आमदार आणि 12 खासदार शिंदे गटासोबत गेल्यानंतर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून बंडखोरांच्या मतदारसंघात शिवसैनिकांशी संपर्क साधत आहेत. याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे हे 2 दिवसीय औरंगाबाद दाैऱ्यावर आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या या दाैऱ्याच्या नियोजनासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शिवसेना, युवासेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी बोलताना खैरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं.

हे ही वाचा : “द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती; महाविकास आघाडीची तब्बल ‘एवढी’ मतं फुटली”

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते शहर आणि शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून औरंगाबाद आणि मराठवाड्याची ओळख आहे. शिवसेनेवर यापूर्वी अनेक संकट आली, पण त्यातून आपण उभारी घेत जोमाने उभे राहिलो. आज जी परिस्थिती शिवसेनेवर आली आहे, तशी यापुर्वीही आली होती. अनेकांनी पक्ष सोडला, गद्दारी केली. पण गद्दारी करणारे संपले, पक्ष मात्र जोमाने वाढत राहिला. त्यामुळे खचून जाता जोमाने कामाला लागा, कारण ठाकरे कुटुंब आणि शिवसेना हेच आपले पंढरपूर आणि पांडुरंग आहेत, असं आवाहन खैरे यांनी यावेळी शिवसैनिकांना केलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

उद्धव साहेब, मी तुमच्यासोबत; बीडच्या कट्टर शिवसैनिकानं रक्तानं लिहिलं पत्र

“देशाला नवे राष्ट्रपती मिळणार; आज मतमोजणी, कोण मारणार बाजी?, यशवंत सिन्हा की द्राैपदी मुर्मू”

एकनाथ शिंदेंचा मला देखील फोन आला होता, पण मी….; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराचा मोठा गाैफ्यस्फोट