आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड करत शिवसेनेत मोठी फूट पाडली. या फूटीनंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर हे सरकार कशामुळे पडलं, याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. यावर आता भाजप नेते राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मीडियासमोर आले असते, तरी सरकार पडलं नसतं, असा दावा राम शिंदेंनी यावेळी केला.
हे ही वाचा : आदित्य ठाकरे तर तुरूंगात गेल्यावर बाहेरच येणार नाही अन् तुम्ही…; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलं आहे, त्यामुळं उद्धव ठाकरे निराशेतून विधानं करतात. त्याच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, असा टोलाही राम शिंदेंनी यावेळी लगावला.
दरम्यान, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कधीच मंत्रालयात गेले नाहीत. संघटनेची बैठक घेतली नाही. आता सरकार पडल्यानंतर ते खडबडून जागे झाले आहेत. बैठका घ्यायला लागलेत, असंही राम शिंदे म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरेंच्या ताकदीत वाढ; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”
आज बोटं मोजताय, उद्या…; मनसेचा शरद पवारांवर पलटवार
शिंदे गटात गेलेल्या ‘या’ नेत्याची शिवसेनेने केली कोंडी, ‘या’ पदावरुन केली हकालपट्टी…