Home महाराष्ट्र …तर देशात लाखो लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला असता- रामदास आठवले

…तर देशात लाखो लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला असता- रामदास आठवले

मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव वाढला असून तो रोखण्यासाठी लॉकडाउन 16 मे पर्यंत वाढवण्याचा  निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचं माझ्या रिपब्लिकन पक्षातर्फे आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून मी स्वागत करतो, असं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

करोनाने जगात थैमान घातले आहे. आतापर्यंत संपूर्ण जगात 34 लाख लोक करोनाबाधित झाले आहेत. भारतात करोनाबाधितांची संख्या ३९ हजार इतकी झाली आहे. महाराष्ट्रात 12 हजार 500 लोकांना करोनाची लगाण झाली आहे. जगात गो कोरोना चा आम्ही नारा दिला. मात्र करोना काही जात नाही. महाराष्ट्रात 500 पेक्षा जास्त लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. लॉकडाउन वेळेवर केला नसता तर देशात लाखो लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला असता, असं रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, लॉकडाउनमुळेच आपण करोनाला हरवू शकतो. लोकांनी घरी राहून लॉकडाउनचे नियम पाळावे. गर्दी टाळावी, असं आवाहनही रामदास आठवले यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आपलं अपयश लपवण्यासाठी छाती बडवण्याचा हा प्रकार- देवेंद्र फडणवीस

जो है पप्पू के यार, कैसे करे मोदीजी से प्यार?; राहूल गांधींवरुन भाजपची शिवसेनेवर टीका

मी काही गमावलं नाहीये…; इरफान खानच्या पत्नीची भावनिक पोस्ट

…तर महाराष्ट्राची प्रगती महाराष्ट्रावर संकटं घेऊन आली असं म्हणावं लागेल