“…तर राष्ट्रवादीच्या मंडळींना तोंड लपवून बसण्याची वेळ येईल”

0
445

सातारा : शिखर बँकेच्या गैरव्यवहारात थोरल्या आणि धाकट्या पवारांचा हात आहे, असा आरोप जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष व माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी केला आहे. कारखान्याच्या वार्षिक सभेत बोलताना शालिनीताईंनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका केली.

शिखर बँकेच्या गैरव्यवहाराची पुन्हा चौकशी सुरू झाली तर राष्ट्रवादीच्या मंडळींना घरामध्ये तोंड लपवून बसण्याची वेळ येईल. सभासद शेतकऱ्यांकडून कारखाना काढून घेण्याचे पाप करणारे राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत, असं शालिनीताई पाटील म्हणाल्या आहेत.

शरद पवारांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारला समाजाविषयी काही देणे-घेणे नाही. हे सरकार पुढच्या वर्षी बरखास्त होईल आणि महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य येईल, असंही शालिनीताई पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे नेते, माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे”

आमचं ठरलंय! 2024 ला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही; संजय राऊतांचं मोठं विधान

इथं लोकांना प्यायलं पाणी नाही आणि नावं कसली बदलताय?; औरंगाबादच्या नामांतरावरून इम्तियाज जलील कडाडले

मुंडे साहेबांच्या आशिर्वादामुळेच मी आज इथंवर पोहोचलो- डाॅ.भागवत कराड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here