‘…तर टक्कल करुन फिरेन’; मनसे नेत्याचं विनायक राऊत यांना आव्हान

0
9

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महायुतीच्या प्रचारात पक्षाचे नेतेमंडळी देखील सहभागी होत आहेत. अशातच मनसे नेते आता विरोधकांवर निशाणा साधत आहेत. मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यावर अतिशय खोचक शब्दांत टीका केली आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांकडून मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत?

भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी मनसे पक्ष मैदानात उतरला आहे. मनसेकडूनही रत्नागिरीत सभा आयोजित करण्यात आली. या सभेसाठी मनसे नेते बाळा नांदगावर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नारायण राणेंच्या प्रचारासाठी मनसेची कोकणात प्रचारसभा पार पडत आहे. यानवेळी बोलताना विनायक राऊत अडीच लाखांनी जिंकून आले तर आपण टक्कल करुन फिरू, अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली आहे.

“रात्री साडेसहा वाजेनंतर भिंत चाचपडत जाणारा माणूस अडीच लाख मतांनी कसा निवडून येणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवावर निवडून येणारी ही लोकं. या विनायक राऊतांना ते राहतात तिथे त्यांना कोण विचारत नाहीत. ते कुठे अडीच लाख मतांनी निवडून येणार? विनायक राऊत अडीच लाख मतांनी निवडून आले तर मी टक्कल करुन फिरेन”, असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस लवकरच…; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

‘…म्हणून मी भाजपसोबत गेलो” ; अजित पवारांचा मोठा खुलासा

गोपाळकृष्ण शाळेत ‘एक पुस्तक आनंदाचे ‘ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here