…तर शिवसेनेची ‘ती’ प्रकरणं बाहेर काढेन; नितेश राणेंचा वरुण सरदेसाईंना इशारा

0
264

मुंबई : भाजप नेते नितेश राणे यांनी सोमवारी वरुण सरदेसाई यांचे सचिन वाझे यांच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप केला होता. यावर प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी आरोप सिद्ध करावेत अन्यथा मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकेन, असं वरुण सरदेसाई यांनी म्हटलं होतं. यावर नितेश राणे यांनी पुन्हा पत्रकारपरिषद घेऊन वरुण सरदेसाई यांना लक्ष्य केलं आहे.

सचिन वाझे यांच्याशी संबंध असल्याची माहिती समोर आणल्यानंतर वरुण सरदेसाई यांनी आम्हाला नोटीस पाठवायची धमकी दिली. मात्र, त्यांनी नोटीस पाठवली तर आम्ही शिवसेनेची अनेक प्रकरणं बाहेर काढू, असा इशारा नितेश राणे  यांनी दिला.

दरम्यान, आम्ही 39 वर्षे बाळासाहेब ठाकरे यांची सेवा केली आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेनेची सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत. तुम्ही आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काढत असाल तर मग आम्हीदेखील रमेश मोरे, सोनू निगम, चंदू पटेल आणि नंदकुमार चतुर्वेदी ही प्रकरणं बाहेर काढू का? ही माहिती बाहेर आली तर तुमच्या कुटुंबाला महाराष्ट्रात फिरता येणार नाही, असंही नितेश राणे यांनी म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची मालमत्ता ED कडून जप्त

डान्स करताना अभिनेत्री उर्वशी राैतेलासोबत नको ते घडलं; पहा व्हिडिओ

राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर; पहा काय सुरू, काय बंद?

मी सुसंस्कृत घरातला, राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे- वरुण सरदेसाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here