Home महाराष्ट्र राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर; पहा काय सुरू, काय बंद?

राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर; पहा काय सुरू, काय बंद?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.

अशी असेल नवी नियमावली

1. सर्व सिनेमागृह, हॉटेल, रेस्टॉरंट हे 50 टक्क्यांच्या क्षमतेनं खुली असतील.

2. मास्क घातलेले नसल्यास सिनेमागृह, हॉटेल, रेस्टॉरंट प्रवेश मिळणार नाही.

3. तापमान यंत्रणाने तपासणी केल्यानंतर कोणाला ताप असलेलं आढळल्यास त्यांना प्रवेश देण्यात येणार नाही.

4. प्रत्येक ठिकाणी हँड सॅनिटायझर ठेवणे आवश्यक आहे.

5. सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना बंदी कायम.

6. जर एखाद्यानं या नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधितांकडून दंडही वसूल केला जाणार.

7. तसेच लग्न समारंभात 50 लोकांनाच परवानगी असेल. तसेच या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार.

8. अंत्यविधीसाठी 20 जणांनाच परवानगी असेल. तसेच तिथल्या स्थानिक प्रशासनानं याची खातरजमा करावी, जास्त लोक आढळल्यास कारवाई होणार.

9. होम क्वारंटाईन व्यक्तींवर शासनाचा कोरोना स्टॅम्प असणं आवश्यक.

दरम्यान, ही नवी नियमावली 31 मार्च 2021 पर्यंत लागू राहणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मी सुसंस्कृत घरातला, राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे- वरुण सरदेसाई

अनिल देशमुख गृहमंत्रीपदी कायम राहणार?; जयंत पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

विश्वास नांगरे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राज्यातील राजकीय घडामोडींना वेग

एपीआय सचिन वाझेंच निलंबिन म्हणजे…; अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका