“…तर मी राजकारण सोडेन; शिवसेना खासदाराच्या आरोपांवर अजित पवार, आक्रमक”

0
577

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी आज माध्यमांशी बोलताना, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

अजित पवार यांनी अर्थमंत्री असताना किती खोके जमवले ते सांगावे. खोक्यांशिवाय अजित पवार काम करत नव्हते. झोपताना आणि सकाळी उठल्यावर खोके पाहणारे लोक खोक्यांवरच बोलतात, पैसे घेतल्याशिवाय दादा कामच करत नव्हते, असा आरोप कृपाल तुमाने केला होता. यावर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : भाजपमध्ये पुन्हा घरवापसी करणार?; एकनाथ खडसेचं मोठं विधान, म्हणाले…

तुमाने यांनी सांगावे किंवा महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीने जरी सांगितले की मी खोके घेतले. तर मी राजकारण सोडेन., अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवारांनी यावेळी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

तुमाने, यांनी सिद्ध करून दाखवावं. सिद्ध करून दाखवलं नाही तर खासदाराने उद्यापासून घरी बसायचे. पण हा असला आरोप माझ्यावर करायचा नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना विचारा माझी कामाची पद्धत कशी होती ते. उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला., असं म्हणत अजित पवारांनी तुमाने यांना जोरदार सुनावलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

“प्रकाश आंबेडकर राजकारणाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत”

औरंग्याचे फोटो जर कुणी झळकवत असेल तर माफी नाही; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

“राष्ट्रवादीचं ठरलं तर मग! शिरूरमधून अमोल कोल्हेच लोकसभा निवडणूक लढविणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here