आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे महाराष्ट्र दाैऱ्यावर आहेत. गेल्या दोन महिन्यात अमित ठाकरेंनी महाराष्ट्रात अनेक दौरे केले आहेत. आज ते नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी एक मोठं विधान केलंय.
सध्याचं राजकारण बघता तरुणांनी राजकारणात यावं का ? असा प्रश्न विचारला असता, मी जर बाहेर असतो तर मी देखील इकडे वळालो नसतो, असं थेट उत्तर अमित ठाकरेंनी यावेळी दिलं. त्यामुळे अमित ठाकरेंच्या या विधानाची चर्चा जोरदार सूरू आहे. तसेच हा दौरा केवळ मनविसेची पुनर्बांधणी करण्यासाठी असून विद्यार्थी व युवा वर्गाशी संवाद साधण्यासाठी आहे., असंही अमित ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा : “शिंदे गटातील आमदार शिवसेनेत परतणार?; ‘या’ नेत्याचं मोठं विधान, म्हणाले, … तर मातोश्रीचे दरवाजे अजूनही खुले”
दरम्यान, अमित ठाकरे हे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून मालेगावात त्यांनी विद्यार्थी व युवा वर्गाशी त्यांनी संवाद साधला. यावेळी मालेगावात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मालेगावात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
केसरकर, आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी, नोकरी पाहिजे असेल तर अर्ज करा; निलेश राणेंचा हल्लाबोल
संजय राऊत यांच्यानंतर काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याच्या अडचणीत वाढ