आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बीड : आरटीआय कार्यकर्ते राम खाडे आणि अॅड. असीम सरोदे यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन या जमीन घोटाळ्याबाबत भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याला सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते शिरुरमधील सभेत बोलत होते.
‘औरंगाबादला पत्रकार परिषद घ्यायची. इकडे भ्रष्टाचार, तिकडे आमकं. माझ्याकडे हजार कोटींचा आकडा सांगितला. हजार कोटी म्हटल्यावर मी म्हटलं सगळं सोडून जातो’, असं सुरेश धस म्हणाले आहेत.
हे ही वाचा : “राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?”
‘मला हजार कोटी नको. मला पन्नास कोटीच द्या. माझ्या बाप-जाद्याची जी काही संपत्ती आहे, तुम्ही म्हणता मी कमावलेली आहे. ती घरादारासकट तुमच्या नावावर करुन देतो. अख्खा जिल्हा सोडून जातो. पन्नासच द्या, हजार कशाला’, असंही सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका केली होती. दादागिरी आम्हाला दाखवू नका. तुम्ही स्वर्गीय अण्णांना फसवून पुढे आलात. मी त्यांचा पुत्र आहे. नवाबभाई सध्या दोनच माणसांच्या मागे लागले आहेत. एक वानखेडे आणि दुसरे जमीन हडप करणारे, असं म्हणत मुंडे यांनी सुरेश धस यांचं नाव न घेता जोरदार टीका केली होती.
महत्वाच्या घडामोडी –
2019 च्या निवडणुकीत जनतेनं तुम्हाला औकात दाखवून दिली आहे; धनंजय मुंडेचा पलटवार
गुलाबराव म्हणाले, मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे; आता हेमा मालिनी म्हणतात…
“मनसेतून राष्ट्रवादीत आलेल्या रूपाली पाटील यांनी हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना केलं अभिवादन”