Home महाराष्ट्र …तर सेना भवन फोडू; प्रसाद लाड यांचं वादग्रस्त वक्तव्य

…तर सेना भवन फोडू; प्रसाद लाड यांचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई : भाजपच्या दादर येथील कार्यालयाचं उद्घाटन आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर निशाणा साधत वादग्रस्त वक्तव्य केलं.

दक्षिण मध्य मुंबईत कोणताही मोर्चा असेल तिथे आम्ही येणार आहोत. मोर्चाला आम्ही आल्यावर तिथे कुणी थांबणार नाही. सेनेच्या कुंडल्या आमच्याजवळ आहेत, असा इशारा प्रसाद लाड यांनी यावेळी शिवसेनेला दिला.

दरम्यान, शिवसेनेला वाटतं की, आम्ही माहीम मध्ये आल्यावर सेनाभवन फोडू तर त्यांना सांगतो की वेळ आली तर आम्ही सेनाभवन पण फोडू, असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी यावेळी केलं.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेनेत माज पाहिजेच, मग कोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल”

गडकरीसाहेब महाराष्ट्राला आपल्या मदतीची गरज- उद्धव ठाकरे

“रिकामटेकडे दौरा करतात की टीका करतात, हे महाराष्ट्राची जनता पाहतेय”

विरोधी पक्ष मोकळा आहे, डोकं रिकाम असतं, आरोप करतच असतात; संजय राऊतांचा टोला