Home अमरावती …तर जितेंद्र आव्हाडांवर कारवाई होणार; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

…तर जितेंद्र आव्हाडांवर कारवाई होणार; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अमरावती : ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून देशभरात संतापाची लाट सुरू झाली आहे. तसेच काहींनी या चित्रपटावर आक्षेप घेतला तर काहींनी या चित्रपटाचं समर्थन केलं आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, यावर प्रतिक्रिया देत, ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं.

चित्रपट निर्मात्याला फासावर लटकावलं पाहिजे, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : भाजप शिवसेना नगरसेवक भर सभेतच भिडले; नेमकं प्रकरण काय?

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यात काहीही बेकायदेशीर आढळलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा फडणवीसांनी यावेळी दिला. ते अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

जितेंद्र आव्हाड जर असं बोलले असतील, तर ते अतिशय चुकीचं आहे. अशाप्रकारे बोलणं हे बेकायदेशीर आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि एका विशिष्ट समाजाचं लांगुलचालन करण्यासाठी ते अशाप्रकारे बोलतात. पण यामुळे इतर समाजात त्यांच्याबद्दल प्रचंड रोष आहे, विशेषत: हिंदू समाजात… हे जितेंद्र आव्हाडांना कळत नाही. त्याचं वक्तव्य तपासून पाहिलं जाईल, त्यांच्या वक्तव्यात काहीही बेकायदेशीर आढळलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा फडणवीसांनी यावेळी दिला.

महत्त्वाच्या घडामोडी –

अजित दादा मुख्यमंत्री व्हावेत, अशी आम्हां सर्वांची इच्छा, पण शरद पवार याबाबत…; ‘या’ आमदाराचं मोठं विधान

उद्धव ठाकरेंचं सरकार फोडून महाराष्ट्रात दुसरं सरकार…; निपाणीच्या सभेत शरद पवारांची भाजपवर टीका

राष्ट्रवादीला साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणणाऱ्या फडणवीसांना, अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…