या सरकारचं कामकाज म्हणजे अजब सरकार की गजब कहाणी- सुधीर मुनगंटीवार

0
185

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजप सातत्याने करत आहे. यातच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अधिवेशन घेण्यात यावं यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलत असताना यावेळी त्यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

कोरोना काळात निर्बंध लावलेले असताना सरकारमधील एक मंत्री 10 हजार लोकांना सोबत घेवून शक्तिप्रदर्शन करतो. पण सरकार महाराष्ट्रात कोरोना हात-पाय पसरत असल्याच्या कारणावरून अधिवेशन रद्द करतं. त्यामुळे या सरकारचं कामकाज म्हणजे अजब सरकार की गजब कहाणी, असा टोला मुनगंटीवार यांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

राज्य पुन्हा एकदा लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर- विजय वडेट्टीवार

“संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही”

खेळपट्टी नव्हे तर सुमार फलंदाजीमुळे सामना 2 दिवसात संपला- विराट कोहली

“ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here