जो त्रास माझ्या मुलीला झाला तो त्रास आरोपीला झाला पाहिजे- पिडीतेच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया

0
268

वर्धा : हिंगणघाट येथे प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून मारण्याची धक्कादायक घटना घडली होती. अखेर त्या तरुणीची मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली. यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून पीडितेच्या वडिलांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

जो त्रास माझ्या मुलीला झाला तो त्रास आरोपीला झाला पाहिजे. आरोपीला आमच्या स्वाधीन करा, असं म्हणत पीडितेच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे.

निर्भयाच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यास ज्याप्रमाणे उशीर होत आहे, तसं न होता लवकरात लवकर आरोपीला शिक्षा द्या, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, जोपर्यंत आरोपीला शिक्षा होत नाही, तोपर्यंत पीडितेचे पार्थिव ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

काँग्रेसचा ‘हा’ नेता म्हणतो; राज ठाकरेंनी मनसेचं इंजिन भाजपला भाड्याने दिलं आहे

अजित पवार थोड्या दिवसांनी शिवसेनाही चालवतील- मनसेचा शिवसेनवर पलटवार

“असा फुकटचा धंदा राज्य सरकारने करू नये”

 त्यामुळे माझ्यावर कमळ बघण्याचे संस्कार नाहीत- शरद पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here