राज्यात तीन पक्षांचं सरकार, कोण निर्णय घेतंय हे त्यांचं त्यांनाच कळेना- रावसाहेब दानवे

0
194

अहमदनगर : राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. कोण निर्णय घेतंय, हे त्यांचं त्यांनाच कळत नाही, असं टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकासआघाडीला लगावला आहे. ते अहमदनगर येथे आयोजित भाजप कारखानदारांच्या बैठकीसाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. कोण निर्णय घेतंय, हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतः निर्णय प्रक्रियेत आम्हाला सामील केलं जात नाही असं म्हटलं. याचाच अर्थ राज्य सरकारमध्ये समन्वय नाही, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

दरम्यान, त्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षेवरही भाष्य केलं. या विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षा न घेता त्यांना श्रेणी दिल्यास या विद्यार्थ्यांना कोविड विद्यार्थी असा शिक्का बसेल, असंही रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचं तर तीन पक्षाचं सरकार

वाढदिवसाच्या दिवशीच अजिंक्य रहाणेकडून आदित्य ठाकरेंचं कौतुक; म्हणाला…

“आदित्य ठाकरेंनी वाढदिवशी केली जन्मतःच हृदयात तीन ब्लॉक असलेल्या बाळासाठी ‘ही’ मोठी मदत

“लॉकडाउन पुन्हा जाहीर केलेला नाही, अफवांवर विश्वास नका ठेऊ”- उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here